बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील महांतेशनगर येथे रविवारी पहाटे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीची घटना घडली. सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महादेव बासोदी हे कुटुंबासह इतरत्र गेले असता चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केली.

घराचे कुलूप तोडून घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून चोरटे फरार झाले. याप्रकरणी माळमारुती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला आहे.