खानापूर : सर्व सरकारी शाळा वाचविणे अभियानच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठी कन्नड तसेच उर्दु सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. सरकारी शाळेच्या पटसंख्येत होणारी घट तसेच अतिथी शिक्षक नियुक्ती तसेच विविध अडचणीवर होणार चर्चा आहे. या बैठकीत सर्व शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष तसेच शिक्षण प्रेमी यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात तसेच शिक्षणाबरोबर अभ्यासाची आवड खेळाची योग कला क्रीडा विविध स्पर्धा संस्कृती जपण्यासाठी गावोगावाच्या मातृभाषा जपल्या पाहिजेत टिकवल्या पाहिजेत आणि आपली मुले मातृभाषेत शिकली पाहिजेत यासाठी सर्व सरकारी शाळा वाचवण्याबाबत अभियान रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० मिनिटांनी आय.बी.कार्यलय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील सर्व शाळा एसडीएमसी कमिटी अध्यक्ष व सदस्य शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वभारती कला क्रीडा संघटना उपशाखा खानापूर यांनी केले आहे.
0 Comments