अंकोला : उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यातील शिरूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली असून त्यात नऊ जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी   सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृतांमधील नऊ पैकी पाच जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.  लक्ष्मण नायक, शांती नायक, रोशन, अवंतिका आणि जगन्नाथ यांच्यासह ९ जण चिखलाखाली अशी दुर्घटनाग्रस्तांची नावे आहेत. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिरुर राष्ट्रीय महामार्गावर एक टेकडी कोसळली असून, स्थलांतराचे काम  आधीच हाती घेण्यात आले आहे. या घटनेत बेपत्ता झालेल्या नऊ जणांपैकी सात जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.