बेळगाव / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्यावतीने शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्या पाया पडून आपल्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी कंकणवाडीतील शेतकऱ्याने अश्रू ढाळल्याची घटना घडली.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर म्हणाले की, शेतकऱ्यांची शेतजमीन दुसऱ्याला देऊ नये, या कायद्यात सुधारणा करून त्याची पुन्हा अंमलबजावणी करावी. एमएसपी दर वाढवण्याबाबत देशातील ३०० ठिकाणी भाषण देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी याकडे लक्ष द्यावे.
उद्याच्या अर्थसंकल्पात त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. पाऊस पडल्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा विसर पडला असून, त्यांना पुरेशी मदत देण्याची मागणी त्यांनी केली. पीक विमाआणि नुकसानभरपाई द्यावी. यापुढे बेळगावच्या डीडीएलआरने शेतकऱ्याची जमीन अधिकृतपणे दुसऱ्याला जाहीर केल्याच्या प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी केली. दोन एकर जमीन गमावलेले कंकणवाडीचे शेतकरी अजप्पा उप्पार यांनी शेतकरी नेते चंद्रशेखर कोडिहल्ली यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांना आपली जमीन वाचवण्यास सांगताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले.
निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची जमीन दुसऱ्याला जाहीर केल्याच्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता.
0 Comments