नमस्कार, 

मी माधवी राठोड "ब्रेनसंकेत" या शैक्षणिक क्षेत्रातील लोकप्रिय क्लासेसची संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी...

स्मार्ट युगात बदलेल्या शिक्षण पद्धतीमुळे सुरुवातीपासूनच मुलांचा पाया भक्कम व्हावा ; स्पर्धेच्या युगात करियर निवडण्यासाठी शालेय जीवनातच मुलांना योग्य दिशा आणि अचूक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सुळगा (हिं.) गावात नुकत्याचं (दि.१५ जून) पासून सुरू केलेल्या "ब्रेनसंकेत क्लासेस"च्या नवीन शाखेला सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

प्ले-ग्रुप, नर्सरी ते दहावी पर्यंत सर्व बोर्ड (स्टेट,सीबीएससी) माध्यम (मराठी, इंग्रजी व कन्नड) आणि सर्व विषयांचे मार्गदर्शन, पाठांतराच्या जोरावर परीक्षा देण्यापेक्षा विषय लक्षात घेऊन मुलांनी परीक्षा द्यावी अशा पद्धतीने मिळणारे शिक्षण...भाषेसाठी स्वतंत्र क्लासेस, अबॅकस, वेदिक मॅथ्स, डीएमआयटी समुपदेशन, व्यक्तिमत्व विकास अशा सर्व बाबींनी परिपूर्ण असलेल्या आमच्या क्लासेसमध्ये अवघ्या महिनाभरात पन्नास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, मुलांना घडवण्यात पालक (आई - वडील) आणि शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान असते. काळाची गरज ओळखून मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी अविरत झटणाऱ्या सुळगा, बेनकनहळळी, हिंडलगा येथील काही पालकांनी मुलांच्या बाबतीत निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधून" यशस्वी पालकत्व" या विषयावर मार्गदर्शन करण्याची विनंती केली, त्यानुसार मी समुपदेशन केलेल्या पालकांनी या विषयावर काम सुरू केले आहे. अर्थात मुलांच्या प्रगतीसाठी पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा घेतलेला निर्णय मनाला समाधान देणारा आहे.

विशेष सांगायचे तर प्राथमिक टप्प्यात पहिली ते चौथी मध्ये अगदी डिस्टिंक्शन (९९%) मार्क्स मिळवणारे विद्यार्थी शिक्षणाच्या पुढील टप्प्यात इयत्ता ५ ते १० पर्यंत ही टक्केवारी टिकवण्याऐवजी मागे पडतात याचे नेमके कारण काय? टीव्ही आणि मोबाईलच्या व्यसनापासून परावृत्त करत मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि वाढत्या वयात त्यांच्याशी कसे वागावे? त्यांच्या अभ्यासाची योग्य पद्धत कोणती? मुलांमधील भाषा कौशल्य कसे सुधारावे ? मुलांच्या शिक्षणासाठी करावयाची गुंतवणूक अशा अनेक समस्यांमुळे चिंताग्रस्त असलेले पालक "ब्रेनसंकेत" क्लासेसच्या माध्यमातून मिळालेल्या सुवर्णसंधीचा लाभ घेत आमच्या संस्थेत समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत.  

बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सुळगा (हिं.) गावच्या पंचक्रोशीत नव्याने सुरुवात केली असतानाच "ब्रेनसंकेत क्लासेसला" दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीत सर्वांनी दर्शवलेल्या विश्वासाबद्दल सविनय आभार !!!


 माधवी राठोड  Bsc. (Chemistry)
 MBA (HR) LLB, M.phil (DMIT)
 Contact : 8421499685 / 7709007975