आंबोली / वार्ताहर 

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव जिल्ह्यासह कोकण आणि गोव्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

दरम्यान बुधवार दि. १७ रोजी बेळगावच्या सीमेलगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी - बेळगाव मार्गावर  आंबोली घाटात धबधब्याजवळ मोठा दगड कोसळला होता.


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात आंबोली घाटातील धबधब्याजवळ दगड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी ही एक दगड रस्त्यावर आला. पण यावेळी रस्त्यावर रहदारी नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला. मात्र यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण  झाली होती.

यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जेसीबीच्या सहाय्याने दगड हटवला आणि वाहतूक सुरळीत केली.