- १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त
- गोकाक पोलिसांची कारवाई
गोकाक / वार्ताहर
कारमधून बनावट नोटांची वाहतूक करणाऱ्या सहा जणांना गोकाक पोलिसांनी अटक केली. गोकाक - बेळगाव मार्गावरील कडबगट्टी गावाजवळ ही घटना घडली. गोकाक - बेळगाव रोडवरील कडबगट्टी गावातून जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी एका कारची तपासणी केली असता , मोठ्या प्रमाणात १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट आढळून आल्या .
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्वर महमदसलीम यादव (वय २६, रा.अरभावी), सद्दाम मुसा यादव (वय २७ रा.महालिंगापूर), दुंडाप्पा महादेव म्हैशेवी (वय २७), रवी चन्नाप्पा हागडी (वय २७), विठ्ठल हणमंत होसकोटी (वय २९), मल्ल आप्पी (वय २९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कारच्या तपासणीवेळी आढळलेल्या १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चौकशी दरम्यान आरोपींनी गोकाक, महालिंगापूर, मुधोळ, येरगट्टी, हिडकल डॅम , बेळगाव, धारवाड आदी ठिकाणी १ लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ४ लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे कबूल केले. या घटनेची नोंद गोकाक ग्रामीण स्थानकात झाली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.. 👇
0 Comments