चिक्कोडी / वार्ताहर
महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चिक्कोडी उपविभागांतर्गत कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून पाणी पातळीत आणखीन वाढ झाली झाली आहे.
आजपर्यंत कोयना येथे ७२ मिमी, वारणा येथे ४८ मिमी, काळम्मावाडी येथे ६० मिमी, महाबळेश्वरमध्ये १५५ मिमी, नवजा येथे ९७ मिमी, राधानगरीमध्ये ५५ मिमी.पावसाची नोंद झाली आहे.
अशा प्रकारे, महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदी ओसांडून राजापूर बॅरेज येथे १३५५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, चिक्कोडी तालुक्यातील कल्लोळ गावानजीक दूधगंगा नदीतून ४५७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि दूधगंगा नद्यांचा संगम असलेल्या कल्लोळ बॅरेजमधून १८१२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीच्या पलीकडील हिप्परगी बॅरेजमध्ये ४ टीएमसी असलेला पाणीसाठा ६ टीएमसी पर्यंत वाढला आहे.
तसेच महाराष्ट्रातील कोयना, धुमा, कणेर, वारणा, काळम्मावाडी आणि राधानगरी धरणांतील पाणीसाठ्यातही गेल्या दोन - तीन दिवसांत वाढ झाली आहे.
0 Comments