बेळगाव / प्रतिनिधी
नियंत्रण सुटलेला एक कंटेनर दुभाजकावर चढून त्याची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात चारजण जखमी झाले. बेळगाव तालुक्यातील हलगा येथे ही घटना घडली.
बेळगाव तालुक्यातील हलगा गावातील अलारवाड ब्रीजनजीक ऑक्स वॅगन शोरूमजवळ गुरुवारी पहाटे एका कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. तसेच बेंगळुरूहून मुंबईकडे निघालेल्या कंटेनरमधील दोन प्रवासीही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments