बेळगाव / प्रतिनिधी 

पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार आहे. याची  दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या बुधवार दि. २४ जुलै रोजी आणखी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा २४ जुलै रोजी बंद राहणार आहेत. यामध्ये अंगणवाडी, सर्व प्रकारच्या प्राथमिक माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीचे वर्ग बंद राहतील असे कळवण्यात आले आहे.

  • बैलहोंगल, कित्तूर आणि कागवाडमध्ये अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या शाळा बंद : 

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल कित्तूर आणि कागवाड या तालुक्यामध्ये अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. यामध्ये अंगणवाडी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांचा समावेश आहे. संबंधित आदेश सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांना लागू असल्याची माहिती देण्यात आली आहे.