• खानापूर तालुक्यातील घटना 

खानापूर / प्रतिनिधी  

विद्युतभारित तारेच्या स्पर्शामुळे म्हैस ठार झाली. खानापूर तालुक्याच्या तोलगी गावात ही घटना घडली. मृत म्हैस शेतकरी शिवाजीराव पुन्नाप्पा दूंडप्पाण्णावर यांच्या मालकीची होती. या घटनेमुळे त्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अन्य एका घटनेत कुसमुळी येथील शेतकरी प्रेमराज नागराज मादार या शेतकऱ्याच्या मालकीची कायदेखील विद्युतभारित तारेच्या स्पर्शामुळे मृत्युमुखी पडल्याने त्याचे ८० हजारांचे नुकसान झाले आहे. सदर घटनांची नोंद नंदगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.