बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे, असे मी यापूर्वीही सांगितले आहे. मला परप्रांतीय ठरवणाऱ्यांना बेळगावच्या जनतेने चोख प्रत्युत्तर देत माझ्या बाजूने विजयाचा कौल दिला आहे.
विजयानंतर बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, भाजपच्या या विजयामुळे मोदींना आणखी बळ मिळाले आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघातून दिवंगत खासदार सुरेश अंगडी ४ वेळा निवडून आले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पत्नी मंगला अंगडी यांनीही विजय मिळवला.
आज आमदार, माजी आमदार, तळागाळातील कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र येऊन भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले आहे. मी १ लाख ७५ हजार इतक्या विक्रमी मतांनी विजयी झालो असून, बेळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेला व कार्यकर्त्यांना माझा अभिमान असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे, असे मी सुरुवातीपासून सांगितले. पण काँग्रेसवाले रोज टीका करायचे. पण जनतेने त्यांना उत्तर दिले आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांची अनेक स्वप्ने मी पूर्ण करेन. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. सर्वाधिक मते देऊन विजयी झालेल्या ग्रामीण भागाच्या विकासावर अधिक भर दिला जाणार आहे. तसेच बेळगावात अधिक रोजगार निर्मिती होणार आहे असे त्यांनी सांगितले.
जिल्हा पालकमंत्री आणि खासदार यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. मी स्थलांतरित नाही. माझे मतदानही बेळगावात हस्तांतरित झाले असून बेळगावचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. काँग्रेस कधीच स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेली नाही. पण मोदींनी २ टर्म म्हणजेच १० वर्षे स्पष्ट बहुमताने आपले सरकार स्थापन केले आहे. यावेळीही एनडीएला मोठे बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
हुबळीचे असूनही बेळगाव किंवा बेळगावकरांची पसंती का आहे? याप्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ज्या मतदारसंघातून विजय मिळवला त्या मतदारसंघाला प्राधान्य देणार असल्याचे उत्तर दिले.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार २० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे सांगत होते. पण आता परिणाम काय? हमीभावाचा खेळ नसून लोकांनी भाजपला साथ दिली आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडी करून सत्तेत आल्याने काँग्रेसमध्ये एकजूट नसल्याची तक्रार होती. काँग्रेस आपले अस्तित्व गमावत आहे. राज्य सरकारची स्थिती नाजूक असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. डीके सुरेश यांच्या पराभवानंतर मतविभागणी वाढणार आहे. विकास शून्य आणि घोटाळे भरपूर आहेत, अशी टीका खासदार शेट्टर यांनी केली. या पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पहा - 👇
0 Comments