बेळगाव / प्रतिनिधी 

बेनकनहळ्ळी येथील एस के एज्युकेशन ट्रस्ट संचलित, सीबीएससी माध्यमाच्या सत संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. एस. के. एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सिद्धारूढ संगोळी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य इरगौडा परसगौडा पाटील उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी योगा विषयी विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सिद्धारुढ संगोळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले, तसेच विद्यालयाचे प्राचार्य इरगौडा परसगौडा पाटील यांनी योगाचे महत्त्व पटवून देताना योग ही आपल्या देशाने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे, त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. 

त्यानंतर विद्यालयाच्या शारीरिक शिक्षका शुभांगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी योग्य प्रात्यक्षिके केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. सातवीतील विद्यार्थिनी समीक्षा देवलती व गणेश पावले यांनी केले. तर आभार इ. आठवीतील विद्यार्थी आर्यन दळवी याने मानले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उत्साहवर्धक होता.