- प्रमुख पाहुण्या सौ. कोमल कोळ्ळीमठ यांचे उद्गार
- सत संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये अभिमुखता दिवस उत्साहात
![]() |
(पालकांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या सौ.कोमल कोळ्ळीमठ) |
अभ्यास करण्यासाठी मुलांवर दबाव तसेच कोणतीही बंधने लादून नका, उलट मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी याकरिता मुलांना मोकळेपणाने अभ्यास करू द्या, त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना उज्ज्वल यश प्राप्त होईल, असे उद्गार सौ. कोमल कोळ्ळीमठ यांनी काढले. शिक्षण हे जीवन नाही तर जीवनाचा एक भाग आहे असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या
सत संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवार (दि. ८) जून रोजी अभिमुखता दिवस उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून पालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर स्कूलचे उपप्राचार्य तथा विद्यमान प्रभारी प्राचार्य इरगौडा परसगौडा पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष सिद्धारूढ संगोळी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी ईशस्तवन, स्वागतगीत, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
![]() |
(दीपप्रज्वलनप्रसंगी प्रमुख पाहुण्या सौ. कोमल कोळ्ळीमठ यांच्यासमवेत प्रभारी प्राचार्य श्री. इरगौडा परसगौडा पाटील सर व इतर शिक्षक ) |
यानंतर प्रभारी प्राचार्य इरगौडा पाटील सर यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह प्रमुख पाहुण्या सौ. कोमल कोळ्ळीमठ तसेच पुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष सिद्धारूढ संगोळी यांचे स्वागत केले.
![]() |
(प्रमुख पाहुण्या सौ. कोमल कोळ्ळीमठ यांचे स्वागत करताना प्रभारी प्राचार्य श्री. इरगौडा परसगौडा पाटील सर ) |
ॲडमिन इन्चार्ज (व्यवस्थापन विभाग प्रमुख) राजेश पालकर यांनी प्रभारी प्राचार्य इरगौडा पाटील सर यांचे पुष्प देऊन स्वागत केले. अंकिता मॅडम यांनी प्रमुख पाहुण्या सौ. कोमल कोळ्ळीमठ यांचा परिचय करुन दिला. प्रास्ताविक भाषणात प्राचार्य पाटील सरांनी शाळेचे व्यवस्थापन, पालकांची जबाबदारी, उद्देश यावर मार्गदर्शन केले.
![]() |
(शाळेचे व्यवस्थापन, पालकांची जबाबदारी, उद्देश यावर मार्गदर्शन करताना प्रभारी प्राचार्य श्री. इरगौडा परसगौडा पाटील सर ) |
तर ॲडमिन इन्चार्ज (व्यवस्थापन विभाग प्रमुख) राजेश पालकर यांनी शालेय शुल्क (फी), युनिफॉर्म (गणवेश) याबाबत माहिती दिली. तर मेंटनन्स विभागप्रमुख युवराज कासोटे यांनी वाहतूक व्यवस्थेसह शिक्षकेतर कर्मचारी अर्थात चालक, सेविका (मावशी) यांच्या दैनंदिन कामाचा आढावा घेतला, तसेच सुरळीत वाहतुकीच्या उद्देशाने पालकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला.
![]() |
(शिक्षकेतर कर्मचारी अर्थात चालकांचा परिचय करून देताना मेंटनन्स विभाग प्रमुख श्री. युवराज कासोटे) |
![]() |
(शिक्षकेतर कर्मचारी अर्थात सेविकांचा परिचय करून देताना मेंटनन्स विभाग प्रमुख श्री. युवराज कासोटे) |
याप्रसंगी २०२३ सालाच्या सीबीएससी परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यानंतर सत्कार झालेल्या विद्यार्थांसह अनेक पालकांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष सिद्धारूढ संगोळी यांनी उपस्थित पालकांना शाळेची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अध्यापक वर्गाने विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज सर आणि नेत्रावती मॅडम यांनी केले. तर सुमा मॅडम यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नवीन तसेच जुने पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments