बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने बेळगावचे पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात लव्ह जिहाद, गोरक्षण, महिलांच्या रक्षणासाठी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत सेलचे अध्यक्ष कृष्णा भट, जिल्हा सचिव आनंद करलिंगन्नावर, जिल्हा उपाध्यक्ष मुनिस्वामी भंडारी, शांता भंडारी, गोरक्षा विभाग प्रमुख विजय जाधव, बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक संतोष मडिगेर, जिल्हा सहसचिव गणेश चौगुले यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments