- बेळगावात AIDSO च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराचा निषेध करण्यासाठी बेळगावात शनिवार (दि. १५) जून रोजी AIDSO च्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली.
या आंदोलना दरम्यान माध्यमांशी बोलताना AIDSO राज्य समन्वयक महांतेश बेलदार म्हणाले, “नीट २०२४ च्या निकालात ६७ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी सर्वाधिक ७२० गुण मिळवले असून ते प्रथम क्रमांकावर आहेत. नीट परीक्षेच्या इतिहासात यावेळी अभूतपूर्व संख्येने विद्यार्थ्यांनी ७२० गुण मिळवले आहेत. यापैकी अनेक विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रावर बसले असल्याचा संशय आहे. त्यामुळे येथे गैरप्रकार झाल्याच्या संशय वाटत असल्याचे ते म्हणाले.
अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत ७१८,७१९ गुण मिळवले आहेत ज्या परिस्थितीत नकारात्मक गुणांमुळे गुण मिळणे शक्य नाही. येथे अशा प्रकारच्या निकालामुळे, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर प्रश्नपत्रिका उशिरा सादर केल्याचे कारण दिल्याने नीट परीक्षेबाबत उदासीनता अधोरेखित होत आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहार हा केवळ एक घोटाळा नाही, तर तो विद्यार्थी संघटनेविरुद्धचा घृणास्पद गुन्हा आहे दुसरीकडे, बिहारमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचे ऐकणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments