• बेळगावात कायदेविषयक कार्यशाळेचे उद्घाटन 

बेळगाव / प्रतिनिधी 

नवीन कायदे एखाद्या व्यक्तीच्या आरामदायी जीवनासाठी अधिक अनुकूल आहेत. मात्र त्यांचे उल्लंघन झाल्यास त्यानुसार शिक्षा केली जाईल, असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक यांनी सांगितले.बेळगाव बार असोसिएशन, बेळगाव व  कर्नाटक राज्य बार कौन्सिल, बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे आयोजित केलेल्या ५ दिवसीय कायदेविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

कायदेविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर बोलताना न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक पुढे म्हणाले, बेळगाव बार असोसिएशनने राज्यात चांगले नाव कमावले असून, व्यक्तीच्या शांततामय  जीवनासाठी कायदे अधिक पोषक आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे युवा समाजाने जागरूक राहायला हवे. कायद्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी स्वरणसिंघे म्हणाले की, ५१ अ अंतर्गत ४२ व्या दुरुस्तीमध्ये ११ मूलभूत कर्तव्ये लागू करण्यात आली होती. आणि आता पुन्हा २०२३ पासून नवीन कायदा लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यशाळेच्या उद्घाटनाला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकटेश नाईक, विशाल, रघु  चन्नप्पागौडा, ॲड. विनय बी. मांगलेकर, ॲड. वाय. के. दिवटे, ॲड. एस. एस. किवडसन्नावर आणि बेळगाव बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.