![]() |
सुळगा (हिं.) येथील आपल्या शेतात धुळवाफ पेरणी करताना श्री. गुरुनाथ व सौ. विमल कलखांबकर हे शेतकरी दाम्पत्य |
अवघ्या काही दिवसातच मृग नक्षत्राला सुरवात होणार असून मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग आला आहे. यंदा वळीव पावसाने दिलासा दिल्याने मशागतीची कामे आटोपून शेतकरी धुळवाफ पेरणीच्या कामात गुंतले आहेत.
![]() |
धूळवाफ पेरणीपूर्वी तयार केलेले शेत |
बेळगाव तालुक्यातही पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग पहायला मिळत आहे. पूर्वी कुरीच्या साहाय्याने पेरणी केली जात होती. मात्र आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे धूळवाफ व रोप लावणे अशा दोन पद्धतीने परणी केली जाते.
दरम्यान बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (हिं.) गावात श्री. गुरूनाथ कलखांबकर आणि सौ. विमल गुरूनाथ कलखांबकर हे शेतकरी दाम्पत्य स्वतःच्या शेतात धुळवाफ पेरणी करताना टिपलेला क्षण याची साक्ष देत आहे.
0 Comments