- अन्यथा जप्तीची कारवाई ; जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी
जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या थकबाकीचे बिल २५ जूनपर्यंत व्याजासह भरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांची समन्वय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
जिल्ह्यात एकूण २८8 साखर कारखानदार असून त्यापैकी ३ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या बिलांची थकबाकी आहे. थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांनी कायद्यानुसार 25 जूनच्या आत थकबाकीची रक्कम १५ % व्याजासह भरावी. विहित मुदतीत थकबाकी न भरल्यास अशा साखर कारखान्यांची जप्ती केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. २५ जूनपर्यंत थकबाकीची रक्कम व्याजासह देण्यात येईल, असे हमीपत्र देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कारखान्यांकडील थकीत रकमेव्यतिरिक्त १५ टक्के व्याजासह मोजणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
0 Comments