• बेळगावातून जगदीश शेट्टर आघाडीवर 

बेळगाव / प्रतिनिधी 

मतमोजणीसाठी नुकतीच सुरुवात झाली असून सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मतमोजणी दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर ३६,८९६ मते तर उमेदवार मृणाल हेबाळकर २८९३९ मते मिळाली असून काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर पिछाडीवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


दरम्यान मतमोजणी केंद्राच्या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले असून जवळपासच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयात चालू आहे. सकाळी साडेसात वाजता स्ट्रॉंग रूम उघडण्यात आले असून मतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कसूर तपासणी करूनच त्यांना स्ट्रॉंग रूममध्ये सोडण्यात येत आहे. बेळगाव शहरासह देशवासीयांची उत्कंठा शिगेला लागली असून आपला खासदार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.