- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे जनतेने मांडल्या समस्या
- समस्या सोडवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
चिक्कोडी / वार्ताहर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानुसार तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक चर्चेचे आयोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. चिक्कोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कम्युनिटी हाऊस येथे झालेल्या जनतादर्शन कार्यक्रमात सहभागी होऊन ते म्हणाले , मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेंगळूरमध्ये जनतादर्शन कार्यक्रम आयोजित करून लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे चांगले काम करत आहेत. विविध विभागांचे अधिकारी येथे उपलब्ध असून आमच्या समस्यांबाबत आम्ही मोकळेपणाने बोलू शकतो.
त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. कर्नाटक डिफेन्स फोरमचे चिक्कोडीचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी रुद्रेश बिरादर यांनी योग्य प्रकारे काम केले नसल्याने त्यांना बडतर्फ करण्यात यावे, तसेच चिक्कोडी येथे पत्रकार गृह बांधण्यासाठी मुंडे यांनी निवेदन दिले. कडेपूर गावात काही शेतात रस्ता नाही. त्याशिवाय दिव्यांग, महिला आणि नागरी सेवकांनी आपल्या समस्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे मांडल्या.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद , पोलिस उपअधिक्षक गोपाळकृष्ण गौडा, एसीपी सुभाष संकपाळ, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
0 Comments