- विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
बेळगाव / प्रतिनिधी
अंमली पदार्थ विक्रीचे जाळे (रॅकेट) शोधण्यापेक्षा तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.पालक आणि मुलांच्या चुकांमुळे समाज बदनाम होऊ नये यासाठी तरुणांनी आपले जीवन जगावे, असे मत बेळगाव शहर गुन्हे व वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी व्यक्त केले. बुधवारी शहरातील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांचे सेवन आणि सेवना विरुद्ध जनजागृती कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थांना संबोधित केले.
अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आजच्या तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होण्याबरोबरच त्यांच्या पालकांची स्वप्ने धुळीस मिळतात आणि समाजात त्यांची बदनामी होते. जीवन पराजय, विजय, निराशा आणि आनंदाच्या क्षणांनी भरलेले आहे, परंतु निराशा किंवा पराभव हा जीवनाचा शेवट नाही.जेव्हा निराशा किंवा पराभव पत्करावा लागतो तेव्हा संयमाने त्याचा स्वीकार करून सुंदर जीवन घडवले पाहिजे, तसेच समाजाचे एक जबाबदार नागरिक म्हणून पुढच्या पिढीसाठी सुंदर समाज घडवायला हवा, असे त्या म्हणाल्या.
अंमली पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी बोलताना त्यांनी व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो हे सविस्तरपणे सांगितले आणि विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ सेवनाच्या धोक्यांबाबत जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन आणि सेवनाच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यास शिकवले.
व्हीटीयूचे कुलपती प्रा. बी. वाय. रंगास्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एमबीए विभागाचे प्रमुख प्रा. प्रल्हाद राठोड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, व्हीटीयूच्या व्यवस्थापन अधिकारी एम.ए.सपना आदी उपस्थित होते.
0 Comments