- म. ए. युवा समितीची मागणी
बेळगाव : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी देशाच्या विविध भागातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. बेळगावमधून सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरला जातात, या निमित्ताने दरवर्षी रेल्वे विभागाकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येते. आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असून तरी देखील नैऋत्य रेल्वेकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वेबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
गेल्यावर्षी देखील रेल्वे विभागाकडून आषाढी एकादशीकरिता फक्त २ दिवस रेल्वे सुरु करण्यात आली होती पण फक्त दोन दिवस सुरु केल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता. म्ह्णून किमान १५ दिवसाच्या कालावधीकरिता रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
दरवर्षी प्रमाणे वारकऱ्यांच्या सेवेसाठी हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. आशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठवले आहे.
0 Comments