मुदलगी : आवराडी नांदगावजवळ १३ जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ओसंडून वाहणाऱ्या घटप्रभा नदीत उलटला. बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगी तालुक्यातील आवराडी गावात कुलगोड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. बागलकोट जिल्ह्यातील नांदगाव गावादरम्यान असलेल्या पुलावरील बंधाऱ्यावर ट्रेलरसह ट्रॅक्टर पाण्यात कोसळला.

ट्रॅक्टरमधून १३ जण मजूरीसाठी आवराडीहून नांदगावकडे जात होते. त्यापैकी पाण्यात पडलेले १२ मजूर सुदैवाने मृत्यूच्या जबड्यातून बचावले. सध्या घटनास्थळी शोकाकुल वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच कुलगोड पोलिस घटनास्थळी भेट देऊन पाहणीकरत आहेत. पाण्यात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.