- आनंदनगर, वडगाव येथील रस्त्यांवर साचले पाणी
बेळगाव / प्रतिनिधी
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील सखल भागात असलेल्या विविध ठिकाणी घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले असून बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
होय ,स्मार्ट सिटी बेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाले असून आनंदनगर, वडगाव येथे रस्त्यांवर पाणी साचले आहे. नाला ओव्हरफ्लो झाल्याने नाल्यामधील कचऱ्यासह पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, नाल्यांची स्वच्छता न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असून येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे.
0 Comments