क्रीडा : टी - २० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ७ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले आहे. संपूर्ण टी-२० विश्वचषकात शांत असलेली विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याच्या बॅटमधून बारतासाठी मॅचविनिंग खेळी पाहायला मिळाली. मात्र या विजयासह भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीने टी - २० मधून आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

विराट कोहलीच्या या शानदार ७६ धावांच्या खेळीसाठी त्याला अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर बोलताना विराट कोहलीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि सांगितले, “हा माझा शेवटचा वर्ल्डकप आहे. हा माझा शेवटचा टी - २० सामना आहे. विश्वविजेतेपदासह टी २० कारकीर्दीला अलविदा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की एकही धाव होणार नाही, पण काही दिवस तुमचे असतात. देवाचे आभार मानतो. मी संघाच्या विजयात योगदान देऊ शकलो याचे प्रचंड समाधान आहे. अंतिम सामन्याच्या संधीचे सोने  करायचे  होते. मला भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. परिस्थितीचा आदर करत मी खेळायचे  ठरवले. मी भारतासाठी शेवटचा टी- २० सामना खेळलो. नव्या पिढीकडे मशाल सोपवण्याची वेळ आली आहे. युवा खेळाडू या जबाबदारीसाठी सज्ज आहेत.” असे विराट म्हणाला.