बेळगाव / प्रतिनिधी
जुने बेळगाव येथील निराधार केंद्रातील निधन पावलेल्या एका वृद्धेवर माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे माणुसकीच्या दृष्टिकोनातून अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये कित्येक वर्षापासून आसरा घेतलेल्या शांता दस्तगीर कोलकार (वय ७०) यांचे गेल्या गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न असल्याने आश्रमचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा जाधव यांनी तात्काळ आपल्या माधुरी जाधव फाउंडेशनमध्ये कार्यरत तेजस मेलगे यांच्यामार्फत निराधार महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली. अंत्यसंस्कारासाठी मेलगे यांना सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, व शंकर कांबळे यांनी सहकार्य केले.
0 Comments