चित्रदुर्ग / वार्ताहर 

मेंढपाळासह मेंढ्यांच्या कळपाला केएसआरटीसी परिवहन बसची धडक बसून झालेल्या अपघातात मेंढपाळासह २१ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. 

एरज्जनहट्टी (ता. चित्रदुर्ग) येथे ही भीषण दुर्घटना घडली. राजप्पा (वय ३०, रा. नेलगेतनहट्टी) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. तर दुसरा मेंढपाळ तिप्पण्णा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, राजप्पा व तिप्पण्णा हे नेलगेतनहट्टी गावातून चन्नागिरीला मेंढ्या चरण्यासाठी गेले होते. पावसामुळे गावाकडे परतत असताना एरज्जनहट्टी येथे तांत्रिक बिघाड झालेल्या केएसआरटीसी परिवहन बसची धडक बसून ही  दुर्घटना घडली. या घटनेची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.