- केएलई (काहेरचा) १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव / प्रतिनिधी
कठोर परिश्रम घेतल्यास शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी - विद्यार्थिनींना नेहमीचं यश मिळेल, मात्र विद्यार्थ्यांनीही कर्तृत्व दाखऊन स्वतःला सिद्ध करावे,असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी व्यक्त केले. केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचा १४ वा दीक्षांत समारंभ सोमवारी येथील जेएनएमसी जिरगे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. सौ. सुदेश धनकड, राज्यपाल थावरचंद गेहलोत, डॉ. रिचर्ड डरमन, केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. नितीन गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी विद्यार्थी - विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती धनकड पुढे म्हणाले, पदवी अविस्मरणीय आहे. पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांची भूमिका वेगळी असते. विद्यार्थ्यांनी नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रयत्नशील राहावे. भारत हा सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. जी २० मध्ये भारताची स्थिती पाहिली जाऊ शकते. विद्यार्थ्यांचे कर्तृत्व हा देशाच्या विकासाचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
- प्रथमच अमेरिकन संशोधकाला डॉक्टरेट प्रदान :
या १४ व्या दीक्षांत समारंभात प्रथमच अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. रिचर्ड जेकब डरमन यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. अमेरिकेचे रिचर्ड डरमन हे गेल्या २७ वर्षांपासून केएलई सोबत काम करताना अनेक विषयांवर संशोधन करत आहेत. आपला देशात नवजात मुलांमध्ये अशक्तपणा (ॲनिमिया) जास्त प्रमाणात आढळतो यावर त्यांनी संशोधन केले आहे. पदवी स्वीकारल्यानंतर डॉ. रिचर्ड जेकब डरमन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केएलई (काहेर) विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
0 Comments