अथणी / वार्ताहर 

नूतन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच एक दिवस आधि अथणीतील सरकारी हायस्कुलला टाळे ठोकण्यात आले आहे. वर्षभरापासून मुख्याध्यापक आणि एसडीएमसी सदस्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

शाळा सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवसपूर्वीचं अथणीमधील ग्रामस्थ आणि एसडीएमसी सदस्यांनी शाळेला टाळे ठोकले आहे.  गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक आणि एसडीएमसी सदस्यांमध्ये वाद सुरु असून या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांची बदली करण्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्याध्यापकांचा कामचुकारपणा यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत असून यासंदर्भात डीडीपीआय, बीईओ यांना अनेकवेळा निवेदन देखील देण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून वैतागलेल्या एसडीएसमसी सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे. शाळेचे मुख्याध्यापाक एम. एस. चौगुले यांची बदली करून त्यांच्या जागी नव्या शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शाळेला टाळे ठोकण्यात आले आहेत.