बेळगाव : चव्हाट गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय बाबुराव पाटील (वय ७४) यांचे दि. १४ मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.
ऑलम्पिक हॉकी खेळाडू कै. बंडू पाटील यांचे ते लहान बंधू होत. त्यांची अंत्ययात्रा बुधवार दि. १५ मे रोजी सकाळी १०.३० वा. चव्हाटगल्ली येथून राहत्या घरातून निघणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ८.०० वा. चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे.
0 Comments