• बैलहोंगल तालुक्यातील घटना 

बैलहोंगल / वार्ताहर 

दारूच्या नशेत पतीने मुलासमोरच पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली. मानबरहट्टी (ता. बैलहोंगल जि. बेळगाव) येथे नेसरगी पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली.फकिरव्वा काकी (वय ३६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती यल्लाप्पा याने घरात झोपलेल्या पत्नीची मुलांसमोर हत्या करून तिथून पळ काढला आहे. 

या घटनेची नोंद नेसरगी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस फरार पती यल्लाप्पा याचा शोध घेत आहेत.