बेळगाव / प्रतिनिधी 

१ जून १९८६ दिवशी बेळगाव येथे झालेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात शनिवार १ जून २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रद्धांजली कार्यक्रम तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. 

या कार्यक्रमास शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष  दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.