• रायबाग तालुक्याच्या कुडची शहरातील घटना  

रायबाग / वार्ताहर 

रायबाग तालुक्याच्या कुडची शहरात अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा अवैधसाठा केलेल्या घरावर छापा मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त करण्यात आला. कुडची येथील अन्न निरीक्षक विनायक बाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून येथील पिरजादे यांच्या घरावर छापा टाकला असता येथे ५० किलो वजनाची एकूण ५२ पोती आणि अवैध तांदळाचा साठा आढळून आला. 

हा सर्व तांदूळ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणी कुडची पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.