बेळगाव : एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२० गुण मिळवणाऱ्या शिवानी लक्ष्मण बेलगळी हिचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला.
कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळा चमकेरीमड्डी (संकोनट्टी) या शाळेची विद्यार्थिनी शिवानी लक्ष्मण बेलगळी हिने एसएसएलसी परीक्षेत ६२५ पैकी ६२० गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील बेळगाव व समाजकल्याण विभागाचे सहसंचालक यांच्याहस्ते शिवानीचा बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला.
0 Comments