अथणी / वार्ताहर
अथणी तालुक्यात क्रुझर वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सांगोला-जत मार्गावर ही घटना घडली. महादेवी चौगला, गीता दोडामणी आणि कस्तुरी तिघीही (रा.बळ्ळीगेरी ता.अथणी; जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
बळ्ळीगेरी गावातून कामानिमित्त जात असताना क्रूझरचा डाव्या बाजूचा टायर टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि क्रूझर उलटली. क्रूझर उलटल्याने तीन महिलांचा गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी बळ्ळीगेरी येथील मृतांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद अथणी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments