बेंगळूर : विधानसौधसमोर झालेल्या कार अपघातात बेळगावच्या बैंलहोंगल मतदारसंघाचे काँग्रेस आमदार महांतेश कौजलगी किरकोळ जखमी झाले आहेत. कब्बन पार्क वाहतूक स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. आमदार घराजवळून येत असताना भरधाव वेगात आलेल्या कारने आमदार महांतेश कौजलागी यांच्या गाडीला धडक दिली. अपघातात किरकोळ दुखापत झाल्याने आमदार कौजलगी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शहराच्या मध्यवर्ती भागातील विधानसौध परिसरात अपघाताचे प्रमाण कमी आहे. मात्र आज सकाळी बेळगावच्या बैलहोंगल मतदारसंघाचे काँग्रेस आमदार महांतेश कौजलगी यांच्या गाडीला अपघात झाला. दरम्यान कब्बन पार्क वाहतूक पोलिसांनी लाल रंगाच्या कारच्या चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.