बेळगाव / प्रतिनिधी 

गोमटेशनगर हिंदवाडी येथील गोमटेश हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ८५ टक्के लागला आहे. हिंदवाडी येथील गोमटेश हायस्कुलच्या दहावी परीक्षेचा निकाल ८५ टक्के इतका लागला असून विशेष श्रेणीत 32 तर प्रथम श्रेणीत 87 विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत यश संपादन केले आहे.

संपदा विवेक सुतार या विद्यार्थिनीने ६२५ पैकी ६१५ गुण मिळवत ९८.४ अशी टक्केवारी गाठत शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर समीक्षा चोर्लेकर हिने ६२५ पैकी ६११ गुण मिळवत द्वितीय, सुमेधा बास्तिया हिने ५९८ गुण मिळवत तृतीय, तर मेघा यंडोळी आणि सम्मेद सुप्पन्नावरने ५८९ गुण मिळवून चौथा क्रमांक पटकाविला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे गोमटेशचे अधिष्ठाता संजय पाटील, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी कौतुक केले.