• मालमत्तेच्या वादातून घडला प्रकार 
  • अथणी तालुक्याच्या कोकटनूर गावातील घटना 

अथणी / वार्ताहर 

मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केली. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील कोकटनूर गावाच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. 

केशव भोसले (वय ४७, रा.दबदबहट्टी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर खंडोबा भोसले (वय २७) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि खून झालेले हे दोघेही दबदबहट्टी गावचे रहिवासी आहेत. 

गेल्या २० वर्षांपासून जमिनीच्या कारणावरून काका-पुतण्या यांच्यात भांडण होते. काल कोकटनूरच्या हद्दीत दोघांनी एकत्र येऊन दारूप्राशन केली. दारूप्राशन

केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर खून झाला. हत्येतील आरोपी खंडोबा भोसले (ऐगळी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी ऐगळी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.