बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक राज्यात उत्तर कर्नाटकातील १४ जिल्ह्यांसह बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होत आहे. दरम्यान आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 


सकाळच्या सत्रातील पहिल्या अडीच तासात तासांच्या काळात सकाळी सात ते साडेनऊ पर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण ९.४८ % तर चिकोडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ११. ६५ % , कुडची मध्ये १०.२२ टक्के मतदान झाले आहे.

बेळगाव शहर उत्तर १०. १५, बेळगाव दक्षिण १०.३१ , ग्रामीण ११.५ ,बैलहोंगल ७.६६,रामदुर्ग ७. १५,सौंदत्ती ८.१२ , गोकाक ९.९५ तर अरभावीत ९.७६ % इतके मतदान झाले आहे.


  • राजकीय लोकप्रतिनिधी आणि उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क : 

सकाळी ७ वा. मतदानाला सुरूवात होताच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मतदारसंघातील हनुमाननगर येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

तर खासदार मंगला अंगडी, भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी अनुक्रमे सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर मतदान केंद्रावर मतदान केले. 

याशिवाय बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी शिवबसवनगर येथील सिद्धरामेश्वर स्कूल येथे मतदान केले.  बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनीही कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. 

तसेच शहापूर येथील मतदान केंद्रात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी १०२ वर्षीय आई आणि कुटुंबासह मतदान केले.

सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. दरम्यान उष्णतेच्या तडाख्याचा धसका घेत मतदारांनी सकाळीच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान निवडणुकीसाठी ४५२४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत व्यवस्थित पार पडण्यासाठी ३४ हजार कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यामध्ये २४ हजार कर्मचारी आणि दहा हजार हे पोलीस व सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत तर चिकोडी लोकसभा मतदार संघांमध्ये १८ उमेदवार आहेत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ४१ लाख ५ हजार २२५ मतदार आहेत बेळगावला १९ लाख २३ हजार ७८८ मतदार असून, चिकोडी मतदारसंघांमध्ये १७ लाख ६१ हजार ६९४ मतदार आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर व कित्तूर मतदारसंघ जोडले आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून ४ लाख १९ हजार ७४३ मतदार आहेत.

  • आतापर्यंत झालेल्या मतदानाची सविस्तर टक्केवारी खालीलप्रमाणे :  
1

2


3