वाराणसी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची  रणधुमाळी सुरु आहे. आत्तापर्यंत मतदानाचे  चार टप्पे पूर्ण झाले आहेत. अद्याप तीन टप्पे बाकी आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  वाराणसी लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत आहेत. यासाठी आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन अर्ज (दाखल करण्यापूर्वी पंतप्रधानांनी दशाश्वमेध घाटावर गंगा पूजन केले तसेच कालभैरव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१४  पासून पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. अर्ज दाखल करतेवेळी नरेंद्र मोदींच्या समवेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह एनडीएची सत्ता असलेले १२ राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.