अथणी / वार्ताहर
खिलेगाव कृषी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण सवदी यांचे निकटवर्तीय अण्णाप्पा बसप्पा निंबाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली. खिलेगाव (ता.अथणी ; जि.बेळगाव) येथे अथणी पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. हत्या करून हल्लेखोर फरार झाले आहेत.
हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. या घटनेची नोंद अथणी पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments