बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 एप्रिल रोजी बेळगाव येथील मालिनी सिटी मैदानावर भव्य सभा घेणार असल्याचे भाजप नेते एम. बी. जिरली यांनी सांगितले.
आज बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते एम. बी. जिरली म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २८ एप्रिल रोजी बेळगावमध्ये येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता बेळगाव विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून १२ वाजता मालिनी सिटी येथे भव्य सभेत ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते विजापूरला रवाना होणार आहेत.
भाजप राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, भाजप निवडणूक प्रभारी राधा मोहन यांचीही उपस्थिती या सभेला असेल. बेळगाव तसेच चिकोडी लोकसभा मतदार संघातील जनता या सभेत उपस्थित राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके बोलताना म्हणाले, रामदुर्गमधील कार्यकर्त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचा असंतोष नसल्याचे बेनके यांनी स्पष्ट केले. या बैठकीला बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर घटक अध्यक्ष गीता सुतार, विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, नगरसेवक हनुमंत कोंगाली आदी उपस्थित होते.
0 Comments