(सुळेभावी - सांबरा महाशक्ती केंद्रातंर्गत गावात
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ
आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना सौ. शिल्पा शेट्टर) 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचाराला हळूहळू वेग येऊ लागला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगदीश शेट्टर यांच्या पत्नी सौ. शिल्पा शेट्टर यांनी प्रचाराची धुरा हाती घेऊन बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील व्याप्तीमध्ये सभा घेऊन जनतेच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. 


यानिमित्ताने सुळेभावी व सांबरा महाशक्ती केंद्रामधील करडीगुद्दी, मारिहाळ, सुळेभावी, माविनकट्टी, बाळेकुंद्री के.एच, श्री राम कॉलनी, इंडालनगर, शिंदोळी आदि ठिकाणी सभा घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विजयाची हॅट्रिक साधण्यासह त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी बेळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे अधिकृत उमेदवार जगदीश शेट्टर यांना मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. 


यावेळी भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या पत्नी सौ. शिल्पा शेट्टर, खासदार मंगला अंगडी, ग्रामीण मंडळअध्यक्ष धनंजय जाधव, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव आदिंनी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी तिप्पाजी मोरे, नानाप्पा पार्वती, मलिकर्जून माद्दन्नावर, सदानंद गडद, यल्लान्ना अष्टेकर, मारूती मुगळी, यल्लेश कोलकार, कल्लाप्पा गिरमन्नावर, प्रभू कवाशी, गणपती होसमनी, भरमा गोमनाचे, वीरभद्र पुजारी, सतीश शहापूरकर, रवी कोटबागी आदिंनी परिश्रम घेतले.