•  जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना 
  •  मीडिया मॉनिटरिंग केंद्राला दिली भेट  

बेळगाव / प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन, फेक न्यूज पसरवणे, निवडणूक जाहिरातींवर लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.

आज शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘वार्ताभवन’ कार्यालयात उभारण्यात आलेल्या मीडिया मॉनिटरिंग केंद्राला भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी ते जिल्हाधिकारी नितेश पाटील पुढे म्हणाले, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या निवडणुकीच्या बातम्या व जाहिराती दररोज तपासण्यात याव्यात आणि आचारसंहिता व नियमांचे उल्लंघन झाल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व आदर्श आचारसंहिता नोडल अधिकाऱ्यांना कळवावे असे निर्देश त्यांनी दिले. 

यावेळी शिक्षण विभागाच्या विशेष  पर्यवेक्षिका श्रीदेवी नागनूर, मुख्याध्यापक लक्ष्मण तळवार, तांत्रिक सहाय्यक महांतेश पट्टण, सहकारी शिक्षक होलेप्पा नायक, सुनील पाटील आणि माध्यम विभागाचे कर्मचारी यांच्यासह मीडिया मॉनिटरिंग सेंटरचे अधिकारी उपस्थित होते.