- बैहोंगल तालुक्यात प्रचाराचा धडाका
बैलहोंगल / वार्ताहर
भारताचे नाव संपूर्ण जगभरात पोहोचविण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. देशात ५० वर्षांत जो बदल होऊ शकला नाही. तो मोदींनी १० वर्षांत करून दाखविला आहे. त्यामुळे काँग्रेसला पंतप्रधानांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे खडे बोल भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी येथे आयोजित बैठकीदरम्यान काँग्रेसला सुनावले.
जगदीश शेट्टर यांनी सोमवारी तसेच मंगळवारीही बैलहोंगल तसेच परिसरात प्रचार दौरा राबविला. उडीकेरी, बोदिहाळ, हिट्टनगी यासह परिसरातील गावांमध्ये सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या कामांची माहिती करून देण्यात आली. देशवासीयांचे स्वप्न असणाऱ्या राम मंदिराचे बांधकाम मोदी यांच्या प्रयत्नांमुळेच पूर्ण होऊ शकले. यापुढेही देशात असे अनेक नवीन बदल घडवायचे असतील तर नरेंद्र मोदीं शिवाय पर्याय नसल्याचे शेट्टर यांनी सांगितले.
- इराण्णा कडाडी यांची काँग्रेसवर टीका :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजेच एक संकल्प आहे. महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध, कामगार शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून परिपूर्ण जाहीरनामा मोदींनी मांडला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपले प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. काँग्रेसकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत परंतु सक्षम नेतृत्व नसल्याने त्यांना केंद्रात सत्ता मिळवणे शक्य नाही. त्यामुळे मतदारांनी काँग्रेसच्या भुलथापांना बळी न पडता भाजपच्या बाजूने मतदानाचा कौल द्यावा, अशी विनंती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेतून मतदारांना केली.
0 Comments