कोगनोळी : कागदपत्रांशिवाय पैशांची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला कोगनोळी चेकपोस्टवर पोलिसांनी अटक केली. कोणत्याही रेकॉर्डशिवाय १२.४९ लाख रुपयांची वाहतूक करणारा हा व्यक्ती बसने महाराष्ट्रातील मुंबई येथून हॉस्पेटला निघाला होता.
दरम्यान कोगनोळी चेकपोस्टवर बस थांबवून तपासणीत केली असता, बसमध्ये प्रवास करणाऱ्या सदर व्यक्तीकडे आढळलेली १२.४९ लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
0 Comments