- श्रीराम सेना हिंदुस्थान - जिल्हा जंगम संघटनेच्यावतीने बेळगावात निदर्शने
बेळगाव / प्रतिनिधी
हुबळीच्या खासगी महाविद्यालयातील एमसीएची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची निर्घृण हत्या करणाऱ्या फय्याज नामक तरुणाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बेळगाव जिल्हा जंगम संघटना आणि श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेने शनिवारी येथील चन्नम्मा सर्कल येथे स्वतंत्रपणे निदर्शने करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
नेहा शिकत असलेल्या महाविद्यालयातीलच एमसीए विभागाचा जुना विद्यार्थी असलेल्या फय्याज नामक तरुण तिच्या प्रेमात पडला होता. मात्र नेहाने प्रेमाला नकार दिला. हा राग मनात धरून गुरुवारी त्याने महाविद्यालयाच्या आवारात नेहाच्या मानेवर दोन्ही बाजूंनी चाकूने तीक्ष्ण वर करून तिची हत्या केली. तेव्हा सदर आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असा आग्रह निदर्शने करणाऱ्यांनी धरला.
नेहाच्या खून प्रकरणाचे राजकारण करणे योग्य नाही. अलीकडच्या काळात हिंदू महिलांना संरक्षण दिले जात नाही. अशा क्रूर लोकांना शिक्षा झाली नाही तर आमच्या आणि तुमच्या घरात अशी घटना घडू शकते. त्यामुळे नेहा हिरेमठच्या हत्येतील आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
यावेळी महंतेश रंगट्टगीमठ, वीरूपक्षी निरलगीमठ, शंकरय्या हिरेमठ, दिग्विजय सिदनाळ, महंतेश वकुंद, मुरुगेश हिरेमठ, रमाकांत कोंडुसकर आदि उपस्थित होते.
0 Comments