• उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आवाहन  

बेळगाव / प्रतिनिधी 

पालकमंत्री म्हणून बेळगाव जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे राबविली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क असल्यामुळेच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच भरघोस मतांनी बेळगावचा खासदार म्हणून निवडून येईन, असा विश्वास भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. सोमवारी जगदीश सेक्टर यांनी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. 



शौर्य चौक, स्वामी विवेकानंद चौक, हनुमान मंदिर संयुक्त महाराष्ट्र चौक, गवळी गल्ली, सरदार्स मैदान या परिसरात चाय पे चर्चाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ चारित्र्याचे सरकार पुन्हा हवे असून भाजपलाच मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी भाजप नेते शंकरगौडा पाटील, जि. पं. माजी सदस्य रमेश देशपांडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









  • मुगाळखोड सुक्षेत्र मठाला भेट :


बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी सकाळी जिल्ह्यातील सुक्षेत्र मुगाळखोड मठाला भेट देऊन डॉ. मुरघराजेंद्र महास्वामी यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. 


यावेळी खासदार व चिक्कोडी लोकसभेचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, राज्याचे प्रधान सचिव पी. राजीव, संकल्प शेट्टर, श्रद्धा शेट्टर आदि उपस्थित होते.

  • ऑटोनगर आणि सदाशिवनगर भागात प्रचारफेरी : 



लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या ऑटोनगर आणि सदाशिवनगर भागातील प्रमुखांना भेटून, मतयाचना केली. 






देशात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर विकासाचे पर्व सुरू झाले  आहे आणि देशभरातील लोकांची अपेक्षा आहे की पंतप्रधान  नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत. या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. 

  • एम.एम.एक्सटेन्सन आणि मालिनी नगर येथील प्रबुद्ध नागरिकांच्या सभेत मतयाचना : 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर मतदार संघातील एम. एम. एक्सटेन्शन आणि मालिनी नगरातील प्रबुद्ध नागरिकांच्या सभेत भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी मतयाचना केली गेली.










नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्यासाठी आपल्याला सर्वांना निरंतर काम करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या संपूर्ण विकासाच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाताला बळ देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाचा मनापासून निर्धार करण्यात आला. 



लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने  बेळगाव उत्तर मतदारसंघातील प्रमुखांना भेटून खुशाली  विचारून, मतमागणी करण्यात आली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गरिबी  पूर्णपणे नष्ट करण्याचा संकल्प केला आहे, आणि आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेले फक्त ट्रेलर आहे. हा संकल्प साकार करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन करण्यात आले. 



यावेळी भाजपाचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी मंत्री मुरगेश निराणी, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेविका लक्ष्मी राठोड,  राजू डोणी, मंडळ अध्यक्ष विजय कोडगनूर, प्रमुख मुरगेंद्रगौड पाटील, ए. एच. पाचापुरी, एम.बी. जिरली यांच्यासह स्थानिक नेते, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.