बेळगाव : कामत गल्ली येथील रहिवासी संजय अशोक किल्लेकर (वय ४२) यांचे आज दि. १० एप्रिल २०२४ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर आज रात्री ९.३० वा. कामत गल्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी रात्री ९ वाजता कामत गल्लीतील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. 

संजय  यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरूवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वा. कामत गल्ली स्मशानभूमीत होणार आहे.